मराठी टाईप करण्यासाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर्स/प्रोग्राम्स/फॉन्ट्स
Initiator des Themas: Varsha0714 (X)
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
Dec 8, 2009

या धाग्यावर मराठी टाईप करण्यासाठी कोणता प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर वापरली जातात/तुम्ही वापरता याविषयी चर्चा करुया. त्या अनुषंगाने मराठी टाईप करताना येणार्‍या अडचणी याविषयीदेखील चर्चा करता येईल.

 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
THEMENSTARTER
बरहा आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड Dec 8, 2009

मराठी टाईप करण्यासाठी मी प्रामुख्याने बरहा (http://www.baraha.com/) चा वापर करते. बरहा वापरुन अक्षरश: कुठेही (वर्ड, एक्सेल पासून अगदी चॅट विन्डोमधेदेखील) मराठीतून टाईप करता येऊ शकतं. परंतु मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ’र्‍या’ हे अक्षर बरोबर दिसत नाही. r^yA असं टाईप करुनही ते ’र या’ (without space) असं दिसतं. हा प्रॉब्लेम कुणाला आला आहे का?

 
Netra Joshi
Netra Joshi  Identity Verified
Kanada
Local time: 02:12
Englisch > Marathi
+ ...
‘ऱ्या’ टाईप करण्याची पद्धत. Dec 9, 2009

मला हा प्रॉब्लेम पूर्वी येत असे. पण आता येत नाही कारण word मध्ये ‘र्‍या’ दोन प्रकारे टाईप करता येतं .
पहिली पद्धत :- r^yaa आणि दुसरी पद्धत :- rxyaa
असं टाईप केलं की व्यवस्थित दिसतं. करून पहा.


 
Gauree Damale
Gauree Damale
Indien
Local time: 14:42
Englisch > Marathi
+ ...
तुमच्या शी चर्चा आवडेल. Dec 9, 2009

मला नक्कीच तुमच्या बरोबर चर्चा करायला आवडेल कारण तुम्ही जो र लिहिण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो मला मान्य आहे. पण तुम्ही प्रोझ च्य सभासद आहात मी नाही मग मी चर्चेस पात्र ठरते का?
तुमच्या शी चर्चा आवडेल.


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
THEMENSTARTER
धन्यवाद नेत्रा आणि गौरी Dec 9, 2009

धन्यवाद नेत्रा. मी तू सांगितलेल्या प्रकारे र्‍या टाईप करुन बघते आणि सांगते.

गौरी, तुझ्या पहिल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. इथे चर्चेत सहभागी होण्यासाठी सशुल्क सभासद (paid member) असण्याची आवश्यकता नाही. बघ, तुझा हा मेसेज इथे दिसतो आहे की!


यानिमित्ताने मला बाकीच्यांनाही हेच सांगावसं वाटतंय की इथल्या चर्चेत सहभागी व्हायला तुम्ही प्रोझचे paid memberच असले पाहिजे अशी अट नाही. त्यासाठी इथे पक्त स्वत:च्या प्रोफाईलची नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजेच sign in करणे आवश्यक आहे.


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
THEMENSTARTER
वर्डमध्ये ’र्‍या’ टाईप करता आला! Dec 9, 2009

नेत्रा अनेक धन्यवाद. तू सांगितल्या पद्धतीने वर्डमध्ये ’र्‍या’ व्यवस्थित दिसतो आहे!

 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
THEMENSTARTER
बरहामध्ये ’अ‍ॅ’ कसा टाईप करायचा? Dec 10, 2009

बरहासंबंधिच अजून एक अडचण आहे ती म्हणजे 'application' 'apple' मधला अ‍ॅ कसा टाईप करायचा? (आत्ता इथे मी गमभन वापरुन टाईप केलाय). बरहामध्ये ऍ दिसतो. अ‍ॅ नाही...कुणाला माहिती आहे का कसा टाईप करायचा ते?


[Edited at 2009-12-10 07:54 GMT]

[Edited at 2009-12-10 07:55 GMT]


 
Netra Joshi
Netra Joshi  Identity Verified
Kanada
Local time: 02:12
Englisch > Marathi
+ ...
तुझ्या प्रश्नाचं उत्तर Dec 10, 2009

नाही . मला पण हाच प्रॉब्लेम येतो आहे. पण हे कुणालातरी माहित असेल. मी शोधून बघते आणि कळलं तर नक्की सांगेन.

 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
THEMENSTARTER
बरहा वापरुन 'अ‍ॅ' Dec 24, 2009

मी बरहाच्या निर्मात्याला विचारुन पाहिलं. त्यांनी असं सांगितलं की बरहामध्ये सध्या अ‍ॅ टाईप करण्याची सोय नाही. पुढच्या रिलीजमध्ये त्याविषयी विचार करण्यात येईल.

 


Dieses Forum wird von keinem Moderator betreut.
Um Verstöße gegen die ProZ.com-Regeln zu melden oder um Hilfe zu erhalten, wenden Sie sich bitte an unsere ProZ.com-Mitarbeiter »


मराठी टाईप करण्यासाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर्स/प्रोग्राम्स/फॉन्ट्स






Wordfast Pro
Translation Memory Software for Any Platform

Exclusive discount for ProZ.com users! Save over 13% when purchasing Wordfast Pro through ProZ.com. Wordfast is the world's #1 provider of platform-independent Translation Memory software. Consistently ranked the most user-friendly and highest value

Buy now! »
Protemos translation business management system
Create your account in minutes, and start working! 3-month trial for agencies, and free for freelancers!

The system lets you keep client/vendor database, with contacts and rates, manage projects and assign jobs to vendors, issue invoices, track payments, store and manage project files, generate business reports on turnover profit per client/manager etc.

More info »